कामगारांची गावाकडे धाव

अंबरनाथ: करोना या संसर्गजन्य आजाराचा परिणाम सर्वच क्षेत्रांत जाणवत असताना नगरपालिकांची रस्त्याची कामे, विकासकामे तसेच बांधकाम क्षेत्रातील इमारत बांधणीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनाही करोनाच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे परराज्यातील अनेक कामगारांनी कामाकडेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे रस्ते आणि इमारत बांधणीच्या कामावर परिणाम होत असल्याची तक्रार कंत्राटदार करत असून, कामगारांचे प्रमाण कमी झाल्याने कंत्राटदार मात्र धास्तावले आहेत. अंबरनाथ, बदलापूरसह अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पालिकेच्या कामे विकासकामांवर येणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाली