सेवानिवृत्ती वेतन धारकांनी दुरध्वनी व ई-मेलवर संपर्क करण्याचे आवाहन

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येते की, सध्या पसरत चालेल्या कोव्हिड१९ आजाराचा धोका लक्षात घेता निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या शंका व अडचणी यांच्या संदर्भात कोषगार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देण्यात टाळावे. आपण आपल्या शंका व अडचणी यांच्या संदर्भात अप्पर कोषगार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांच्या दूरध्वनी क्र.०२२-२५४४५५८४ या क्रमांकावर किंवा ई-मेलto.thanezillamahakosh.in या Email.id वर संपर्क करावा.असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ठाणे राजेश भोईर यांनी केले आहे.